Posted in दुर्गवीर प्रतिष्ठान, Joy of Happiness

अंधाराशी नाते आमुचे….

24129928_1982760528405818_7353308329609449632_n
होय आमचं या अंधाराशी जून “नातं” आहे. हे नातं आम्ही हौसेने नाही जोडलंय, ते परिस्थितीने लादलंय आमच्यावर….. आम्हीही आस लावून असतो कधीतरी आमच्या आयुष्यात प्रकाश येईल आणि आमची परिस्थिती उजळून निघेल…..
#JoyOfHappiness

माझे अंतरंग
https://mazeantrang.wordpress.com/

Advertisements
Posted in दुर्गवीर प्रतिष्ठान, Joy of Happiness

Joy Of Happiness 

Joy OF Happiness

#JoyOfHappiness
माझ्या एका परिचयाच्या व्यक्ती ने मला विचारल “तुम्ही लातुर ला जे सोलार दिवे, भांड्यांचे किट, वाचनालय, शाळेची इमारत देणार, या एवढ्या मोठ्या उपक्रमात माझ्या २००-५०० रुपयाने काय फरक पडणार ?? पण निट विचार केला तर फरक पडतो एक सोलार दिवा रु.७००/-, एक भांड्यांच किट रु.२५०/-, एक वाचनालय रु.५०००/-(अंदाजे). यातुन स्वेच्छेने किती सोलार लॅंप किंवा भांड्यांच्या सेट ची किंमत तुम्ही देवु शकता हे तुम्ही ठरवा. तुमच्या छोट्यातली छोटी मदत एखाद्या गरिबाच्या घरात प्रकाश देवु शकतो. तुमच्या सहकार्यानेच उभ्या राहणा-या शाळा आणि वाचनालयातुन एक सुशिक्षीत पिढि घडणार आहे.
फरक पडतो फक्त तुमचा मदतीचा एक हात सर्व परिस्थिति सुधारु शकतो. लोकसहभागात एक ताकद असते जी एक पिढि घडवु शकते. तुम्ही सहकार्य तर कराच शिवाय तुमच्या परिचयाच्या व्यक्तिंना नक्की आवाहन करा.
संपर्क:-
टीम : दुर्गवीर प्रतिष्ठान
संतोष हसुरकर 9833458151 अजित राणे 8097519700 नितीन पाटोळे 8655823748
टीम MSA
नितेश जाधव 9967070987 / प्रशांत टक्कर 9967500889 / नंदू चव्हाण 9892042704
मदत रोख स्वरुपात द्या किंवा चेक स्वरुपात किंवा बॅंक ट्रान्सफर करा.
बँक तपशील :-
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero )

Posted in माझे अंतरंग, Joy of Happiness

दुस-याला देण्यातल सुख…

दुस-याला देण्यातल सुख…

कधी कधी दुस-याला देण्यात जास्त सुख असं म्हणतात ते उगाच नाही….

ह्या छायाचित्रातील मुलगा अगदीच गरीब घरातील “मृगगड” परिसरातील अगदी छोट्याश्या गावातील. Joy Of Happiness या Nandu Chavan​  यांच्या उपक्रमाअंतर्गत दुर्गवीर तर्फे यांच्या शाळेला Water Purifier चे वाटप करण्यात आले म्हणून या पट्ठ्याने “स्वत:” बनविलेले “दिवाळी ग्रीटिंग कार्ड” दुर्गवीरांना भेट दिले. ते देताना त्याच्या चेह-यावरच “आनंदच” सर्व काही सांगून जात होता. साध्या कागदावर पेन्सिल आणि स्केच पेन ने “रेघा” ओढून बनविलेल्या या ग्रीटिंग कार्ड ने आणि या शाळेच्या “पापभिरू” मुलांनी सर्व दुर्गवीरांच्या “मनात घर केलय” एवढं नक्की !!

Posted in माझे अंतरंग, Joy of Happiness

तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

छायचित्रातील जोडप्याच्या संसाराला ऐन “दिवाळीत” “प्रकाशमान” करणारी भेट मिळाल्यावर हे भाव त्यांच्या चेह-यावर तरळत होते…. तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

नेमके हेच भाव टिपण्याचे भाग्य आम्हाला लाभले ते नंदू चव्हाण यांच्या Joy Of Happiness च्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून साकारलेल्या उपक्रमातून… नंदू चव्हाण यांच्या सहकार्याने दुर्गवीर च्या माध्यमातून साल्हेर परिसरातील आदिवासी पाड्यात “सौर दिवे” म्हणजे Solar Lamp चे वाटप करण्यात आले.

संतोष दादा प्रत्येकाला नावानिशी बोलवून ह्या वस्तू द्यायला सांगत होते. अस करण्यामागे त्यांचा हेतू एकाच होता प्रत्येकाला ते समाधान लाभाव की मी “थोडस” तरी चांगल करू शकतो… यात प्रसिद्धी चा हव्यास कधीच कुणाला नव्हता. दोन संस्था दोन वेगवेगळे मार्ग असले तरी, धेय्य एकच म्हणून अनेक समविचारी माणसे एकत्र येउन हे कार्य करतात. यात कुणाला माझ नाव हव, माझा फोटो हवा हा हव्यास मुळीच नव्हता…. खर तर हा हव्यास नसावाच कारण तो हव्यास असेल तर हे कार्य कधीच पूर्णत्वास जाणार नाही.

ही मदत करण्याने ते आदिवासी ” अपंग” होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. “कुणालाही “बोटांचा आधार” देताना त्याच्या “कुबड्या” होणार नाहीत याच भान असावं लागत” . हि मदत म्हणजे त्यांना “बोटांचा आधार” असतो त्या “कुबड्या” नक्कीच नसतात. मदत इतकीच करावी कि त्याचा “आधार” होईल ती इतकी असू नये कि त्याची “सवय” होईल…

प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी चांगल करायचं असत पण त्यासाठी काही छोट्या छोट्या आनंदावर विरजण घालाव लागत. ऐन दिवाळीत घरच्यांसोबत दिवाळी साजरी करावी अस प्रत्येकाला वाटत आणि ते स्वाभाविक आहे पण त्यातला थोडा वेळ या कार्यासाठी देण्याची तयारी प्रत्येकानी ठेवली तर किती बर होईल ना !!!

मी तर तो आनंद मिळविला तुम्ही कधी मिळविणार????
दुर्गवीर चा धीरु