Posted in Uncategorized

ज्ञानभाषा मराठी

ज्ञानभाषा मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलते मराठी…… खरच प्रत्येक मराठी माणसाच भाग्य आहे की त्याला वैभवसंपन्न मराठी भाषा बोलण्याची संधी मिळालीय… आज गुढिपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवली येथे सुचीकांत वनारसे यांनी स्थापन केलेल्या “ज्ञानभाषा मराठी” समुहाच्या रथासोबत गुढिपाडवा प्रभात फेरीत सहभाग घेतला, तेव्हा प्रकर्षाने जाणवल की “ज्ञानभाषा” मराठी का असावी किंवा मातृभाषेतुनच शिक्षण का असावं ??
रथ यात्रेदरम्यान वृषाली ताई आणि प्रियंका ताई ज्या उत्साहाने बोलत होत्या तो उत्साह पाहुन त्यांची या विषयाबद्दलची तळमळ जाणवत होती. “मराठी चा आग्रह” हा मुद्दा तर होताच पण “मातृभाषेतुन शिक्षण” हा मुद्दा मला जास्त भावला. मराठितुनच शिक्षण घ्यायला हवे हा मुद्दा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिल पण मातृभाषेतुन शिक्षण हा मुद्दा कदाचित देशव्यापी असु शकतो किंबहुना तो देशव्यापी व्हावा कारण मातृभाषेतुन दिलेले शिक्षण हे बाल्यावस्थेत आकलनासाठि सर्वात सोपे असते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल आहे. इंग्रजी भाषेचे माजलेले स्तोम आज प्रत्येक मातृभाषेला गिळंकृत करीत आहे त्यासाठी प्रत्येकाने मातृभाषेचाच आग्रह धरायला हवा. “आमची मुल तर Convent ला जातात” हे अभिमानाने सांगणा-या पालकांनी यावर नक्कीच विचार करायला हवा. 


मराठीचा आग्रह आणि मातृभाषेचा आग्रह या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. वृषाली ताई यांनी बोलताना एक वाक्य बोलून दाखविले कि मी जर गुजरात मध्ये असते तर “गुजराती” भाषेचा आग्रह धरला असता आणि अर्थातच आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे “मराठी चा आग्रह” ही स्वाभावीक प्रतिक्रिया आहे.
सर्व सभासदांचा उत्साह वाखाणण्याजोग होता अगदी रात्री दिड वाजेपर्यंत रथ सजविण्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत असो किंवा रथयात्रेदरम्यान उन्हाची तमा न बाळगता केलेली पायपीट सर्वच वाखाणण्याजोग होत अगदी ४ थी – ५ वी मधील लहान मुलीपासून ५०-६० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वच नेटाने काम करीत होते.
मयुर घोडे यांच्या ‪#‎मराठीबोला_चळवळ‬ च्या निमित्ताने “ज्ञानभाषा मराठी” या समुहातील मृणाल पाटोळे यांच्याशी ओळख झाली. गेल्या ४-५ वर्षात गुढिपाडवा “दुर्गवीर प्रतिष्ठान” सोबत “गडावर तोरण बांधुन” साजरा करायचो. या वर्षी गडावर जाणे शक्य झाले नाहि पण “ज्ञानभाषा मराठी” चित्ररथात सहभागी झाल्याने ख-या अर्थाने दिवस सार्थकी लागला. मला या कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मृणाल ताई पाटोळे यांचे शतश: आभार… 


या मोहिमेत सहभागी होणा-या ज्ञानमंदिर शाळेचे शरद पोळेकर, सागर महाजन, सौ. विभा जाधव, उन्मेष सर, देवधर काका, सायली आयरे, वैशाली ताई, चंद्रकांत ताकभाते, प्राजक्ता ताकभाते, सुभाष पाटोळे, महाले सर, उन्मेष इनामदार, अनंत देवधर, देवस्थळी काका, निखिल धुरी यांच्या सोबत ज्ञान मंदिर शाळा, शिवाई शाळा, गणेशनगर जोंधळे शाळा, कलिका क्लासेस चे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यात सहभागी होऊन “आमुच्या उराउरात स्पंदते मराठी” चा प्रत्यय दिलाय एवढ नक्की !!!
(टीप :- माझी समुहात फारशी ओळख नसल्याने अनावधानाने कुणाचे नाव नमुद करायचे राहिल्यास क्षमस्व)
धन्यवाद !
जय शिवराय !

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s