Posted in Uncategorized

कन्हैया कुमार…. (Updated Version of Kejriwal & Hardik Patel)


कन्हैया कुमार…. (Updated Version of Kejriwal & Hardik Patel)

कन्हैया कुमारच जेल मधुन सुटका झाल्यावरच भाषण ऐकल ! छान वाटल अतिशय मुद्देसुद आणि शांतपणे भाषण केल किंबहुना आपल मत मांडल. भविष्यात एक चांगला राजकारणी होणार इतक नक्कि (भविष्यात कशाला आत्ताच)

या मुलाचा फोकस क्लिअर आहे. त्याने जे ठरवलय तसच तो वागतोय. सध्या त्याच लक्ष्य ABVB, भाजप, संघ आणि मोदि हे आहे. त्याच्या संपुर्ण भाषणात त्याने आपला फोकस यावरच ठेवला होता. फक्त JNU पुरता विचार करायचा तर तिथे अगदि कमी फरकाने तिथल्या निवडणुकांचा निकाल लागला. त्याने घेतलेले मुद्दे कोणते ? तर रोहित वेमुल्ला ची आत्महत्या, भाजपाच हिंदूत्वाच राजकारण, परिणाम सरकारच अपयश. त्याच्या म्हणन्यानुसार त्याला देशातच आझादि हवीय म्हणजे ज्या देशात तो देशद्रोहाचा आरोप (खरा खोटा माहित नाही ) लागुनही पुन्हा कॅालेज कॅंपस मध्ये मुक्तपणे वावरतोय, घोषणा देतोय त्या देशात त्याला आझादि हवीय बर कशासाठी तर देशात सुधारणा घडवायचीय, जातीभेद नष्ट करायचाय. छान !! हे विचार ऐकुन प्रभावित व्हायला होत. पण लगेच एक मुद्दा लक्षात येतो जर जातीभेद नष्ट करायचाय तर लाल झेंडा, निळा झेंडा, लाल सलाम कशासाठी आता हे लाल निळा सलाम जातियवादाचा पुरस्कार करत नाहित का ? मुळात राजकारण याला वारसाहक्काने मिळालेलं आहे त्याचे आईवडील डाव्या विचारसरणीचे प्रखर नेते. किंबहुना ज्या वातावरणात तो वाढला ते गावच मुळीच डाव्या विचारसरनीच.

>> कन्हेय्या कुमार भाषणांच्या काही मोजक्या नोंदि लक्षात घेतल्या त्या पुढिलप्रमाणे
>जेलमधुन सुटल्यावरच्या भाषणात कन्हैया कुमार च थेट लक्ष भाजप, पंतप्रधान, RSS, ABVP होत. आणि आपण या देशाला मानतो पण या देशातल्या जातियवादाला, मनुवादाला, ब्राह्मणीकरणाला आपला विरोध आहे.मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो पण त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या नियमानुसार चाललेला देशाची व्यवस्था मान्य नाही. हा दुटप्पीपण काही समजला नाही. म्हणजे राजकारण करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच नाव वापरायच पण त्यांनी लिहिलेलं संविधान नाही मानायचं हा तर डॉ. बाबासाहेबांचा अपमान झाला. या अगोदरच्या कुठल्याच भाषणात यांनी तिरंगा नाही फडकवला पण तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मात्र सगळीकडे तिरंगा फडकताना दिसत होता वा तेरी देशभक्ती.

>जेलमध्ये जाण्याअगोदरच्या वृत्तवाहिणीच्या चर्चेत आपण देशद्रोही नाहि उमर खलीदच्या कार्यक्रमाशी आपला संबंध नाही, देशद्रोहि घोषणा कोणी दिल्या माहित नाहि. हे सर्व ABVP,RSS आणि भाजप घडवुन आणत आहे. तो कार्यक्रय थांबवण माझ काम नाहि.पोलिस तिथे होते त्यांनी घोषणा देणा-यांना थांबवल का नाही. पोलिस कुठल्या यंत्रणेचे राज्य सरकारच्या दिल्लीत सरकार कुणाच आप च मग दोष केंद्र सरकारचा कसा काय ???

> कार्यक्रम रद्द झाल्यानंतरच्या भाषणात पहिली प्रतिक्रिया कॅालेज प्रशासनाने कार्यक्रम रद्द केलाच कसा कुणाच्या सांगण्यावर केला. परवानगी नाकारायची होती तर पहिल्यांदा परवानगी दिलीच का?म्हणजे ही परवानगीRSS, भाजप, ABVP च्या दबावाने नाकारली.

>कॅालेज च्या निवडणुकापुर्वीच्या संप्टेंबर २०१५ च्या भाषणात कन्हैया ने मांडलेली मत – देशात परिणामी कॅालेज कॅंपसमध्ये जे चाललय ते चुकिच आहे. ABVP, भाजप देश बिघडवतायत. त्यात कॅान्ग्रेससुद्धा त्यांना साथ देतय. वगैरे वगैरे.

कन्हैया या अर्विभावात बोलतोय देशात इतकी अराजकता आहे की यापेक्षा तालिबान बर ! अहो पण त्या तालिबानात ब्लॅागवर लिखान केल तर गोळ्या मारल्या जातात आणि तुमच्या Video ला YouTube वर लाखो लोक पाहतात मग अजुन कसल स्वातंत्र्य हव. तुम्हाला देश बिघडलाय अस वाटतय ना… मग तिकडे JNU मध्ये कशाला निवडणुक लढवता या बाहेर आणि सोडवा सर्वसामान्यांचे प्रश्न. तुम्ही कॅालेजच्या निवडणुका लढवुन देश सुधरवणे म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकण्यासारख आहे.

माझ एक प्रामाणिक सल्ला आहे कन्हैया कुमार ला जर जमलच तर स्वताची सद्सक विवेक बुद्धी वापर आणि या राजकारण्यांच्या तालावर नाचण सोडून दे स्वताच अस्तित्व बनव. आज हे विरोधक सरकारला शह देण्यासाठी तुझी लाखोंची वकिली फी भरून तुला सोडवतायत ते उद्या तुझी गरज भागल्यावर सोडून देतील. आज कन्हैया भगवा झेंड्याच राजकारण करणा-यान जर तू (कन्हैया) दोष देत असशील तर तू स्वत लाल, निळे झेंडे दाखवून तू तरी काय करतोयस.

कन्हैया कुमार सारख्या चांगल्या वक्त्याचा विरोधक चांगलाच वापर करतायत बाकी काही नाही. थोडक्यात सांगायच तर गेल्या दोन वर्षात Launch आलेल्या केजरीवाल आणि हार्दिक पटेल च Updated Version म्हणजे कन्हैया कुमार !!!

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s