Posted in माझे अंतरंग, Joy of Happiness

तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…


तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

छायचित्रातील जोडप्याच्या संसाराला ऐन “दिवाळीत” “प्रकाशमान” करणारी भेट मिळाल्यावर हे भाव त्यांच्या चेह-यावर तरळत होते…. तुझ्या माझ्या संसाराल आणि काय हव…

नेमके हेच भाव टिपण्याचे भाग्य आम्हाला लाभले ते नंदू चव्हाण यांच्या Joy Of Happiness च्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून साकारलेल्या उपक्रमातून… नंदू चव्हाण यांच्या सहकार्याने दुर्गवीर च्या माध्यमातून साल्हेर परिसरातील आदिवासी पाड्यात “सौर दिवे” म्हणजे Solar Lamp चे वाटप करण्यात आले.

संतोष दादा प्रत्येकाला नावानिशी बोलवून ह्या वस्तू द्यायला सांगत होते. अस करण्यामागे त्यांचा हेतू एकाच होता प्रत्येकाला ते समाधान लाभाव की मी “थोडस” तरी चांगल करू शकतो… यात प्रसिद्धी चा हव्यास कधीच कुणाला नव्हता. दोन संस्था दोन वेगवेगळे मार्ग असले तरी, धेय्य एकच म्हणून अनेक समविचारी माणसे एकत्र येउन हे कार्य करतात. यात कुणाला माझ नाव हव, माझा फोटो हवा हा हव्यास मुळीच नव्हता…. खर तर हा हव्यास नसावाच कारण तो हव्यास असेल तर हे कार्य कधीच पूर्णत्वास जाणार नाही.

ही मदत करण्याने ते आदिवासी ” अपंग” होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. “कुणालाही “बोटांचा आधार” देताना त्याच्या “कुबड्या” होणार नाहीत याच भान असावं लागत” . हि मदत म्हणजे त्यांना “बोटांचा आधार” असतो त्या “कुबड्या” नक्कीच नसतात. मदत इतकीच करावी कि त्याचा “आधार” होईल ती इतकी असू नये कि त्याची “सवय” होईल…

प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी चांगल करायचं असत पण त्यासाठी काही छोट्या छोट्या आनंदावर विरजण घालाव लागत. ऐन दिवाळीत घरच्यांसोबत दिवाळी साजरी करावी अस प्रत्येकाला वाटत आणि ते स्वाभाविक आहे पण त्यातला थोडा वेळ या कार्यासाठी देण्याची तयारी प्रत्येकानी ठेवली तर किती बर होईल ना !!!

मी तर तो आनंद मिळविला तुम्ही कधी मिळविणार????
दुर्गवीर चा धीरु

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s