Posted in Uncategorized

हरवलेलं कोकण…


हरवलेलं कोकण…

येवा कोकण आपलोच असा अस अभिमानान आम्ही सांगतो पण मुळात “माझो कोकण” माझो रवलोच नाय हा…. ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत.

आज माझ्या कोकणात आंब्याच्या बागेत राखणदार कोण ? “नेपाळी” रखवालदार !! अरे माझे कोकणी बांधव खय गेले मुंबईक आणि मुंबईत येवन करतत काय ? ३०००-४००० ची लाचा-याची नोकरी… अरे पण मुळात तो नेपाळी कोकणात आणतात कोण आमचे पैशेवाले बागायतदार… का तर म्हणे गावातली पोर एकतर चोरी-मारी करतात नाहीतर दादागिरी करतात… ह्या नेपाळ्यांना दादागिरी काय ते माहितच नाही आणि भुरटी चोरी ते करतच नाहीत डायरेक्ट मर्डर करून दरोडा टाकून कायमचे नेपाळ ला पळून जातात.

आज माझ्या कोकणातल्या घरांची Contract कोण घेता खयचो तरी शहा, ठाकूर नायतर अजून कोण ?? आता हे लोक Contract घेतात याला माझा विरोध नाही पण… मग माझो मालवणी भाव काय करता त्या Contractor कडे गवंडीकाम करता रोजनदारीवर…

आज माझ्या कोकणातील बेकरी व्यवसाय कोणाच्या “दाढीत” आहे हे सांगायला नको। जर हे “दाढीवाले” जर एवढा मोठा व्यवसाय टाकू शकतात तर माझो “कोकणी भाव” काय फक्त त्या “दाढि” वाल्याचे पाव आणि वडे खावन जगतलो…

आज माझ्या कोकणात Tourism चा व्यवसाय जोरात होऊ शकतो पण त्यासाठी आम्ही कुठल्या मालवणी किंवा कोकणी माणसाशी संपर्क केलाच नाही कारण तो संपर्क लगेच होईल इतका कोणी मोठा झालाच नाही !! बाहेरचे लोक येउन व्यवसाय करतात याला माझा अजिबात विरोध नाही पण माझो “कोकणी भाव” करता तर त्याच Travel कंपनीत ड्रायवर म्हणून नोकरी करता.

आज ह्या कोकण आपल्या “कोकणी भावा” पासून दुरावलेला असा आणि ह्या “कोकण” कोकणात रवान हरावलेला असा…

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s