Posted in Uncategorized

हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार


हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार
“सम्राट चंद्रगुप्त” व “ग्रीक राजा सेल्युकस” ची राजकन्या यांचा विवाह झाला व त्यांचाच पुत्र “बिंदुसार”. ई.स.पू. २९८ ला “चंद्रगुप्त” मरण पावला व “बिंदुसार” त्या गादीवर बसला. “बिंदूसार” हा पित्याप्रमाणे महाराक्रमी होता. त्याने “चंद्र्गुप्ताचे” अखंड हिंदुस्थान चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली होती. उत्तर हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिण स्वारी केली आणि तिथेही आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या पराक्रमाने त्याचे शत्रू त्याच्या विरोधात उभे राहत नव्हते. त्याच्या याच पराक्रमाने त्याला “अमित्रघात” म्हणजेच “शत्रूंचा कर्दनकाळ” हि पदवी मिळाली होती. त्याने उत्तर – दक्षिण – पूर्व – पश्चिम अश्या संपूर्ण हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. पूर्व नि पश्चिम समुद्राच्या मध्यांतरीच्या तब्बल १७ राजधान्या “मौर्य साम्राज्यात” सामील करून घेतल्या असा उल्लेख ग्रंथातून आढळतो. “सम्राट बिंदुसारने” आपले ;सैन्यबळ इतके वाढविले होते कि त्या काळी संपूर्ण विश्वात प्रबळ सैन्य असणारे राष्ट्र होते “हिंदुस्थान”….

“चाणक्य” च्या प्रबळ बुद्धी च्या जोरावर व चंद्रगुप्ता अतुलनीय शौर्याच्या बळावर उभे केलेले अखंड भारताचे “शिवधनुष्य” बिंदुसार ने लीलया पेलेले होते किंबहुना अल्पायुष्यामूळे अर्धवट राहिले पित्याचे स्वप्न “बिंदुसार” ने शतश: पूर्ण केले होते.प्रथम चंद्गुप्ताचा पायाभरणी आणि त्यावर बिंदुसारने ने उभारलेला कळस यामुळे जे “हिंदुस्थान” एक प्रबळ राज्य म्हणून उदयास आले होते त्याही दहशत इतकी होती कि चंद्रगुप्त, बिंदुसार आणि सम्राट अशोक यांच्या मृत्युनंतर काही काळ म्हणजे अंदाजे १०० वर्षे तरी कुणी परकीय आक्रमक हिंदुस्थानावर आक्रमण करण्याची हिम्मत करू शकले नाहीत.
असा हा महान राजा ई.स.पु. २७३ साली वारला आणि एका तेजपुंज राजा पित्याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत झटला…

माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने – स्वातंत्रवीर सावरकर

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s