Posted in Uncategorized

संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?


संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?

आपण आपले मराठी कॅलेंडर निट पाहिले तर “शालीवाहन शके 1936” किंवा “विक्रम संवत् 2071” वगैरे दिसेल हे नक्की काय असते आणि याची उत्पत्ती कुठून झाली हे आपणांस कदाचीत माहीत नसेल. यावर्षीच – 2014च कॅलेंडर निट पाहिले तर लक्षात येते की, “गुढिपाडवा” “31 मार्च 2014” रोजी “शालीवाहन शके 1936 प्रारंभ” असे आहे. “दिपावाली पाडवा” “24 ऑक्टोबर 2014” रोजी “विक्रम संवत् 2071 प्रारंभ” असे आहे. म्हणजे “शालिवाहन शक” “येशु ख्रिस्त” च्या नंतर सुरू झाले व “विक्रम संवत्” हे “येशु ख्रिस्ताच्या” अगोदर सुरू झाले.

संवत् / सवस्तर / शक म्हणजे एखाद्या राजाने त्याने केलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून त्या दिवासापासुन नविन वर्ष सुरू करणे. प्रथम “शक” हा शब्द “संवत् / संवस्तर” यासाठी पर्यायी “परकिय शब्द” आहे. इतिहासात उपलब्ध नोंदिनुसार आजवर टिकलेले काहि संवत् उपलब्ध आहेत :-

1. कृत किंवा मालव 2. विक्रम 3. शालिवाहन

> ई.स. पूर्व 57 च्या आसपास मालवांनी परकिय शकराजा “नहपानचा” पराभव केला, तेव्हा “मालवगणांनी” “शक” सुरू केला तो “कृत” होय.

> “मालव संवत” पुढे “उज्जइनिच्या” “विक्रम” राजाच्या विजयाप्रित्यर्थ “विक्रम संवत्” म्हणून प्रसिध्द झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे.

> काहि इतिहासकारांच्या मते “मालव संवत” हा सुरूवातीपासुन “विक्रम(विजयाचा) संवत्” होता.

> काहि इतिहासकारांच्या मते “विक्रम संवत्” चा संबंध “मालवगण” संवत्‌शी नाहि. परकिय शकांचा राजा “ओझोझ” ने ई.स.पु. 58 ला एक “शक” सुरू केले ते विक्रमाच्या विजयानंतर ते “विक्रम संवत्” म्हणून प्रचलीत झाले.

> काहि इतिहासकारांच्या मते ई.स.पु. 58 ला “विक्रम” अगोदरपासुन राज्य करत होता त्याने त्यानंतर “कुशाण-शकांवर” विजय मिळवीला म्हणून “विक्रम संवत्” सुरू केला त्याचा “मालवांशी” किंवा “ओझोझ” शी काहिहि संबंध नाही.

> यापैकि कोणत्याही मतास कोणताही ठोस पुरावा अजुनही उपलब्ध नाहि.

> “शालिवाहन शक (संवत्)” याबाबतीतही अशी मतभिन्नता आहे.

> काहिंच्या मते कुशाणांचा पहिला राजा “क्याड्फोइसेस” ने इ.स. 78 मध्ये हा शक चालु केला तर..

> काहिंच्या मते ई.स. 78 मध्ये “क्याड्फोइसेस” नाही तर त्याचा पुढचा राजा “कनिष्क” याने त्याच्या राज्यरोहणाच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शक चालु केले व पुढे “पैठणच्या शालिवाहकांनी” परकिय शकांवर विजय मिळवून त्याला “शालिवाहन शक” हे नाव दिले.

> काहिंच्या मते ई.स. 78 च आसपास शलिवाहनातील “गाथा शप्तशती” लिहीणाऱ्या “हाल” नावाच्या राजाने स्वत: गुजरात, सौराष्ट्रातील परकिय शकांवर विजय मिळविला त्याचे स्मारक म्हणून “शालिवाहल शक” सुरू केले.

> यातील सर्व मते विचारात घेतल्यावर एक बाब समोर येते ती म्हणजे कोणतेही मत ग्राह्य धरायचे तर ते वादादित ठरू शकते.

> यातुन एक मत स्पष्ट जाणवते की, “विक्रम संवत् (संवस्तर)” असो किंवा “शालिवाहन संवत्  (संवस्तर)” हे सर्व भारतीयांनी रणांगणात “शक-कुशाण” या “परकिय व क्रुर आक्रमकांवर” मिळविलल्या विजयाचे द्योतक आहे.

खास सुचना :- आपल्या मराठि कॅलेंडरमध्ये “शालिवाहन शक” असा शब्द असल्यास “शालिवाहन संवत्” किंवा “शालिवाहन संवस्तर” असा वाचावा कारण “शक” हा शब्द परकिय आक्रमकांसाठी वापरला गेला आहे.

माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने – स्वा. सावरकर

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s