Posted in माझे अंतरंग

संताप………….संताप………….

आजवर दुर्गवीर सोबतच्या प्रत्येक मोहिमेत चांगलेच अनुभव आले. प्रत्येक गडदर्शन मोहिमेनंतर मन बहरून जायचं… निसर्गाचा आणि त्या काळातील आपल्या राजांच्या बौद्धिक क्षमतेचा हेवा वाटायचा. पण आजची विसापूर आणि लोहगड ची मोहीम अक्षरशा संताप देऊन गेली.…. एक वेळ अस वाटल बस झाल ते करिअर आणि कुटुंबाची काळजी करणं… सोडून सगळ सरळ तलवार हातात घ्यावी आणि एकेकाला कापून काढावा……

आम्ही दुर्गवीर सकाळची इंद्रायणी एक्स्प्रेस पकडून लोणावळा व तिथून मरोळ येथे पोचलो तिथून चालत विसापूर च्या पायथ्याशी पोचलो तेव्हा लोहगड च्या दिशेने जाणा-या गाड्या दिसल्या पण त्यात दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी टवाळ मुल (मुल कसली कार्टी) दिसली. डोक्यात संतापाची ठिणगी पडली. गावक-याना या बाबतीत विचारल तर “आम्ही काय करणार??” “आम्ही विचारल तर दम-दाटी करतात??” अशी मुळमुळीत उत्तर मिळाली. तो राग तसाच डोक्यात ठेवून आम्ही विसापूर ची चढाई सुरु केली. काही ओळखीचे दुर्गप्रेमी भेटले त्यांची भेट घेऊन गडाच्या माथ्यावर पोचलो तर तिथे पण हेच. कुठे जोडप आडोश्याला बसलय तर कुठे मुल-मुलि त्यात विवाहित जोडपी हि सामील होती. मोठमोठ्याने गाणी (गाणी कसली बोंबाबोंबच करत होते)म्हणत पावसाचा आनंद घेत होती. नशीब आमच कि त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या नव्हत्या. अजित दादांनी त्यांना समजावचा प्रयत्न केला पण त्यात जास्त स्त्रियांचा भरणा असल्यामुळे आम्ही जास्त वाद घालू शकलो नाही. माझ्याही सहनशक्तीच्या पलीकडे सर्व असल्याने मी तिथून लांब जाउन उभा राहिलो. आपल्या गडांची होत असलेली विटम्बना पाहून भर पावसात रडायला येत होत आणि येणारे अश्रू त्या पावसाच्या पाण्यात विरून जात होते. तोच राग मनात ठेवत आम्ही पुढे निघालो. गर्द धुके आणि अधूनमधून मुसळधार पाउस झेलत आम्ही गडदर्शन केल आणि शेवटी बिरुदावली देत आम्ही पुन्हा गड उतरण्याच्या तयारीला लागलो. मुसळधार पाउस झेलत आम्ही गड उतरलो पण गडाच्या पायथ्याशी जे पाहिलं ते आम्ही झेलू शकलो नाही एका गाडीत मोठमोठ्यांनी DJ लावून मुल नाचत होते. ते अश्लील नाच-गाण करण्यात मुलीही आघाडीवर होत्या. त्यात मराठी मुला-मुलींचा भरणा जास्त होता. आम्ही पण हतबल झालो अजून तरी काय करणार “आपलेच दात आणि आपलेच ओठ” अशी अवघडलेली परिस्थिती झाली होती तरी मी त्या गाडीच्या नंबर प्लेट चा फोटो काढून घ्यावा म्हणून पुढे गेलो तर काचा गाडीच्या आता मला “भलतेच दृश्य” दिसले. ती मुल दारू पिऊन धिंगाणा करीत होती पण त्या “टवाळ्या” पोरी काय XXXX पिउन आलेल्या का? या पोरींचे आईबाप सोडतात कसे या पोरींना या अश्या अश्या “नालायक” मुलांबरोबर या पिकनिक ला जातात नको ते “अश्लील चाळे” करतात यांना लाजा कश्या वाटत नाहीत…. “स्त्री” या निसर्गाचा अद्भुत अविष्कार………. एक स्त्री प्रत्येक भूमिकेत जबाबदारीने वागते मग ती जबाबदारी “मुलीची” असो वा “बहिणीची”… “बायकोची” असो वा “आईची”… आमची आई आणि बहिण यांनी तर त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली… मग या लाज सोडलेल्या मोजक्या “टवळ्या”च काय करायचं तुम्हीच सांगा…. बर यांच्या कानाखाली खेचावी तर स्त्री वर हात उचलल्याचा गुन्हा दाखल होतो… एखादी दुर्गवीर ची रणरागिणी सोबत असती तर झिंज्या उपटायला लावल्या असत्या आणि त्या बेवड्यांची मग फेस येईपर्यंत धुलाई केली असती…पण या पैकी काहीही शक्य न झाल्याने निघालो लोहगड च्या दिशेने….

लोहगड च्या पायथ्याशी असणा-या हॉटेल मध्ये जेवलो तर तिथे पण कहर एक प्लेट जेवण रु.१६०/- म्हणजे तिथे येणा-या प्रत्येकाची फसवणूक होतेच आहे. पुढे हि फसवणूक सहन न झाल्याने हॉटेल मालकांना थोडे ज्ञानामृत पाजून आम्ही लोहगड चढायला सुरुवात केली.गड चढताना जोडपी आणि काही अतिउत्साही तरुण यांची चाललेली फालतूगिरी आता सहनशक्ती च्या पलीकडे चालली होती. प्रत्येक दुर्गवीर शांतपणे चालत होता पण सर्वांच्या मनात आग धुमसत होती. फक्त त्याच्या भडका उडायचा बाकी होता. काही तरुण काळ्या पिशवीतून काही वस्तू घेऊन जात होते मी त्यांना अडविले बॉटल चेक केली तेव्हा कळल Sprite आहे पण तिथून जाणा-या स्त्रियांची ते मस्करी करत होते त्याबाबत त्यांना समाज देऊन आम्ही पुन्हा गड चालू लागलो पुढे पहिल्या कि दुस-या दरवाजापाशी एक तरुण सिगारेट पीत उभा होता. ते पाहून आमच्या अजित दादाचं डोक सटकल आणि त्याची यथेच्छ धुलाई झाली. तो माफी मागून सिगारेट विझवून निघून गेला पण आमच्या मनातल्या आगीचा भडका उडाला होता पुढच्या दरवाजात असलेल्या सिक्युरिटी चा “दंडुका” घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे असणा-या एका गुहेत काही ७-८ तरुण दारू पीत बसले होते. अजित दादा, प्रशांत, राज, मी आम्ही सगळे आत घुसलो त्याबरोबर त्यांची पळापळ सुरु झाली. सर्वाना गुहेच्या बाहेर काढल अजित दादांनी मारायला सुरवात केलीच होती. त्यांनी आपला सगळ सामान घेऊन खाली जायची तयारी केली शिवाय आम्ही जाईपर्यंत हाता-पाया पडत होते. त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली ती सर्व मुल मराठी होती आणि जवळपासच्या गावातील एक मुलगा त्यांना मदत करत होता. त्याचा आवाज हळू हळू वाढत होता अजित दादांनी दंडुक्याच्या जोरावर त्याचा आवाज बंद केला. पुढे गड पाहून आम्ही उतरायला सुरुवात केली तिथेही एक “महाभाग” सिगारेट पिताना दिसला त्याचेहि कान चेक करत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो

या मोहिमेत आम्ही काय मिळवलं……… फक्त आपल्या मराठी तरुण-तरुणींची बिघडलेली पिढी पाहिली. … आणि झाला तो फक्त मनस्ताप………………. खर तर आम्ही “दुर्गदर्शनासाठी” गेलो पण त्यासोबत “पावित्र्यरक्षण” मोहीम आटोपून आलो…. माझ सर्व हंदू बांधवाना आवाहन आहे कि अश्या लोहगड सारख्या अनेक गडांवर सुट्टीच्या किंवा इतर दिवसात खास “पावित्र्यरक्षण” मोहिमांचे आयोजन करावे. स्थानिक पोलिस अधिकारी व ग्रामस्थ यांनी सुद्धा सदर गोष्टीस आळा बसावा यासाठी प्रयत्न करावेत. आणि इतर गोष्टींचे “ढोल” वाजवणा-यांना माझ आवाहन(आव्हान समजा हव तर!!) आहे…………. तुम्ही सुद्धा हि गोष्ट मनावर घ्या आणि थांबवा हे घाणेरडे प्रकार.

बाकी यापुढे कोणी अशी फालतू कृत्य करताना दिसलं तर…. मुलगी असो मुलगा चोप हा द्यायचाच हा विचार आमच्या सोबत तुम्ही सुद्धा मनात पक्का करा

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s