Posted in मराठी ग्राफीटी

किल्ले सुरगड


किल्ले सुरगड तालुका रोहा, गाव खांब येथे वसलेला एक गड घेरा सुरगड या नावाने ओळखला जातो. रोहा – कोलाड – खांब – वैजनाथ (एस. टी. / सहा आसनी रिक्षा) २० कि.मी. अंतर. पायथ्यापासून अंतर २५० मीटर. मध्यम चढाई श्रेणीचा हा गड. या गडावर चढाई करण्यासाठी खांब गावातून दोन मार्ग आहेत पहिला मार्ग चढताना मध्येच एक दगडी घळ चढून जावे लागते. हि घळ पार करणे थोड कठीण आहे परंतु दोरीच्या साहाय्याने हि घळ पार करता येते. दुसरा मार्ग या घळीच्या सभोवती फेरा मारून गेल्यावर आहे. घळ येण्यापूर्वी डाव्या बाजूला इंजाई देवीचे मंदिर आहे. सध्या इथे मंदिराचे अवशेष व मूर्ती बाकी आहे. घळ पार केल्यावर म्हणजेच दक्षिणेकडून पुढे गेल्यावर गडावर जाण्यापूर्वी वाटेत एक मारुती शिल्प आहे या मारुतीच्या कमरेला खंजीर लावलेला आहे. सध्या या शिल्पाची अवस्था थोडी वाईट आहे. पुढे एक धन्य कोठार आहे. माथ्यावरून उत्तरेकडे गेल्यावर हेमांडपंथी मंदिराचे अवशेष आहेत तिथे पूर्वी तिथे शिवमंदिर होते असे मानले जाते. गडावर किमान १४ टाक्या आहेत संशोधन केल्यास अजूनही टाक्या मिळण्याची शक्यता आहे. वरती एक बुरुज आहे व अरबी व फारसी भाषेतील एक शिलालेख आहे. या शिलालेखावर सुरगड असा स्पष्ट उल्लेख आहे. आज गडाची अवस्था फारशी चांगली नाही. ,आणि म्हणूनच दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई, चे अध्यक्ष संतोष हसुरकर यांच्या संकल्पनेतून आणि दुर्गवीर च्या सर्व ज्ञात – अज्ञात शिलेदारांनी एकत्र येऊन ५ फेब्रुवारी २०१२ रोजी सुरगड श्रमदानास सुरुवात केली.
मुंबई आणि पुणे येथून अनेक शिवप्रेमींनी येथे येउन कित्येक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. पुण्याच्या शिवप्रेमी / गडप्रेमीना एकत्र करण्याचे काम दुर्गवीर चे पुण्याचे शिलेदार सचिन जगताप व प्रदीप पाटील यांनी उत्कृष्टरित्या पार पडले आहे. दुर्गवीर परिवाराच्या आत्तापर्यंतच्या मोहिमांमध्ये टाक्यांची साफसफाई करण्यात आली. या टाक्यां मधील पाणी गडप्रेमीना वर्षभर पिण्यासाठी वापरता येते. टाक्यांच्या साफसफाई सोबत पायवाटेचे कामही करण्यात आले. दुर्गवीर च्या शिलेदारांनी गडाच्या परीसरात इतस्तत: पसरलेले भलेमोठे दगड उचलून वापरले. या पायवाटेच्या सहाय्याने कोणतेही दुर्गप्रेमी न चुकता गडमाथ्यावर पोहोचू शकतात. पायवाट व टाक्यांच्या शिवाय दुर्गवीर परिवाराने गडावरील मंदिराची बांधणी करण्याचे संकल्प आहे. मंदिराचे बांधकाम करताना कोणतेही सिमेंट चे बांधकाम करण्याचे दुर्गवीर ने कटाक्षाने टाळले. मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ दुर्गवीर च्या शिलेदारांनी अन्साई देवीच्या मंदिराचे काम सुरु आहे. या मंदिरा च्या बांधकामासाठी गडाच्या परिसरातील मोठमोठे दगड उचलून आणून रचण्यात आले. भविष्यात गडावरील शिवमंदिर, मारुती मंदिर बांधून पूर्ण करण्याचा मानस आहे.
दुर्गवीर च्या मुंबई च्या दुर्गवीर आणि वीरांगणानि हे गडकोट जपण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले आहे. गरज आहे ती तुम्हा सर्व शिवप्रेमींच्या सहकार्याची.
तुम्हाला या श्रमदान मोहिमेत सहभागी व्हायचे असल्यास संपर्क करा

संतोष हसुरकर :- 9833458151
अजित राणे :- 8097519700
नितीन पाटोळे :- 86558 23748
सचिन जगताप (पुणे) :- 9890662885
प्रदीप पाटील (पुणे) :- 9404137023
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/Durgveer.warasGadDurganch
https://www.facebook.com/groups/durgveer/
“दूर्गवीर प्रतिष्ठान”
नोंदणी क्रमाक: जि.बी.बी एस.डी.१६१३/२०१०
धोभी घाट, वाकोला ब्रिज,
सांताक्रुज (पू) मुंबई ४०००५५.
ईमेल: durgveer.com@gmail.com
santoshhasurkar@yahoo.com,

दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/ — 

Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s