Posted in Uncategorized

भगवं वादळ…भगवं वादळ…

 दि.१९/२/२०१३ रोजी  शिवराज्याभिषेक सोहळा समिती, उस्मानाबाद आयोजित 383व्या शिवजयंती कार्यक्रमात दुर्गवीर प्रतिष्ठान ला खास आमंत्रण देण्यात आले होते. ते निमंत्रण स्वीकारून आम्ही दुर्गवीर मी, संतोष हासुरकर, अजित राणे  अमित शिंदे, उमेश पारब, मनोज मोरे, सुरज कोकितकर, अनिकेत तमुचे, महेश सावंत असे ९ दुर्गवीर आम्ही ४००-४५० कि.मी. चे अंतर पार करून या 383व्या शिवजयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गेलो.  सोमवारी रात्री उस्मानाबाद च्या दिशेने निघताना मनात  उत्सुकता होती. ती उत्सुकता जसजसे ते उस्मानाबाद च्या जवळ जात होतो तशी वाढत होती.  पण पुढे जाउन एक भगवं वादळ आम्ही अनुभवणार होतो याची आम्हाला कल्पना नव्हती.  
  जसजसे आम्ही उस्मानाबाद शहरात प्रवेश करू लागलो तसे ओमकार नायगावकर, अविनाश निंबाळकर यांच्याशी फोन वर बातचीत चालू झाली.  त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे पुढे जात होतो.  जाताना रस्त्यात आम्हाला जाणवत  होत कि आम्ही “भारत” किंवा “इंडिया” त नाही तर आमच्या हिंदुस्थानात आहोत.  गल्लोगल्ली शिवजयंतीची लगबग, दोन्ही बाजूना भगवे झेंडे आणि फक्त  भगवेच  झेंडे.  मन अक्षरशा अभिमानाने भरून येत होते.  जाणीव होत होती महाराजांनी निर्माण केले ते हेच हिंदवी स्वराज्य!!!  उस्मानाबादकरांचा हा भगवा नजराणा आम्ही डोळे भरून पाहत जिजाऊ चौक च्या दिशने चाललो. तिथे पोचताच आमच्यासाठी ओमकार नायगावकर, अविनाश निंबाळकर हे तिथे तयारच होते.  आम्हाला तिथे पाहून त्यांना  झालेला आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.  तो आनंद होता तो एक शिवप्रेमी दुस-या शिप्रेमींना भेटल्याचा.  जय शिवराय जय शिवराय करीत गळाभेट करीत  आम्ही त्यांची भेट घेतली.  त्यांनी लगेचच आमची रहायची व्यवस्था केली होती तिथे आम्ही पोचलो.  स्वताच्या व्यस्त कार्यक्रमातून आमची योग्य व्यवस्था त्यांनी केली होती. नंतर आम्ही मुख्य कार्यक्रम जिथे महाराजांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक होणार होता तिथे गेलो.  तिथे असलेला शिवरायांचा गजर, जय शिवराय च्या घोषणा आसमंत अगदी दुमदुमून टाकत होते.  इतक शिवमय वातावरण मी आयुष्यात पहिल्यांदा बघितल होत.  आमचे ओमकार बंधू तर अक्षरशा पेटून उठले होते. त्यांच्या घोषणा काही थांबत नव्हत्या.  आम्ही सर्व दुर्गवीर तिथला  तो उत्साह निरखून पाहत होतो.  अक्षरशा एक “भगवं वादळ” तिथे घोंगावत होते आणि त्या वादळाच्या तडाख्याने “हिरवा पालापाचोळा” कुठच्या कुठे उडून गेला होता.  नंतर काही वेळातच शिवरायांचे १३ वे वंशज “मा. संभाजी राजे (कोल्हापूर)”   आगमन झाले त्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक व पूजन झाले. ठरल्याप्रमाणे नंतर Bike Rally ला सुरवात झाली हजारो बाईक स्वार Rally साठी हजर होते. ते सर्व पाहून शिवरायांचे स्वराज्यातील मावळे शत्रूवर तुटून पडण्यासाठी चालले आहेत असाच भास होत होता.  सर्वांच्या Bike वर भगवे निशाण डौलाने फडकत होते. आणि प्रत्येकजन एका स्वयंशीस्ती ने तिथे वावरत होता.  आम्ही काही काळ हे शिवमय वातावरण अनुभवले नंतर आमच्या निवासस्थानी निघालो.  थोडा आराम केला तोवर पुन्हा आमची भेट घेण्यासाठी अविनाश निंबाळकर आले त्यांच्या सोबत आम्ही  काही वेळ चर्चा केली. तस प्रथम दर्शनी पाहता निसर्गात दणकट शरीरयष्टी लाभलेले अविनाश दादा बोलताना अक्षरशा आग ओकत होते.  त्यांच्या बोलण्यातून शिवरायांविषयी आत्मीयता, इतिहासाबद्दल तळमळ स्पष्ट दिसत होती.  काही वेळात आम्ही जेवणाला सुरुवात केली तिथे आम्ही अविनाश दादा, आणि ओमकार दादा याचे विचार एकत होतो.  त्यांच्या बोलणं अंगावर रोमांच उभ करत होत.  आजच्या घडीला शिवरायांचे चाललेले बाजारीकरन या मुद्द्यावर  दणकट शरीरयष्टीचे अविनाश  दादा भावनाविवश झाले, ते अश्रू  कमजोरीचे नव्हते ते अश्रू  आजच्या आपल्या इतिहासाबद्दल, शिवरायांबद्दल असलेल्या उदासीनतेबद्दल असलेलि चीड व्यक्त करत होते.  नंतर संतोष दादांनी त्यांच्या कार्यात आपले पूर्ण सहकार्य असल्याचा त्यांना शब्द दिला.  जेवण होईपर्यंत आम्ही दुर्गविरांनी त्यांचे काठोकाठ भरलेले शिवप्रेम अनुभवले.  त्यांना हि “दुर्गवीर” आणि “दुर्गवीर चे कार्य” याबद्दल प्रचंड आदर होता तो त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. एका शिवप्रेमीने दुस-या शिप्रेमीला त्याच्या शिवकार्याची दिलेली ती पावती होती.  नंतर आमची परतीची वेळ झाली होती त्यावेळी  शिवराज्याभिषेक सोहळा समिती, उस्मानाबाद चे अध्यक्ष आणी त्याचे सहकारी आमच्या सदिच्छा भेटीसाठी आले.  एका संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्हाला भेटायला आले होते ते पाहून आमचा उर अक्षरशा भरून आला. तेव्हा आम्हाला समजल कि दुर्गवीर च्या कार्याला लोक किती मान देतात. ते आम्हाला भेटायला आले आमच कौतुक केल हीच आमच्या कार्याची पावती होती.  नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो… 
पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला “हिंदुस्थानातून” “इंडिया” कडे… पण जाण्या अगोदर आम्ही अनुभवल ते एक “भगवं वादळ” जे पाहताना आमच्या मनात एकच इच्छा होती हे  वादळ आपल्या मुंबईत याव आणि इथे वाढलेले हिरव रान भूईसपाट करून जाव… 
जय शिवराय
Advertisements

Author:

एक कोडं न उलगडणारं……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s